भिवंडीमध्ये कोरेक्ससारख्या औषधाचा साठा जप्त; २ आरोपी अटकेत
भिवंडी – कोरेक्ससारख्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या टोळीवर भिवंडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ३० जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुलजार नगर, भिवंडी येथील एका गोडाऊनमध्ये कोरेक्स प्रकारच्या औषधाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, पोलीस निरीक्षक जनार्दन सोवणं, सपोनि श्रीराम माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी Codeine Phosphate & Triprolidine Hydrochloride ONREX Cough Syrup 100ml या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या ९,१२० बाटल्या सापडल्या. जप्त केलेल्या औषधाची एकूण अंदाजे किंमत ₹३,७८,८००/- इतकी आहे.
या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले:
-
अहमद मोहम्मद इस्मा मोमीन (वय ३१), रा. गौरीपाडा, भिवंडी
-
अब्दुलरऊफ अलीराजा सिद्दिकी (वय २५), रा. शांतिनगर, भिवंडी
या प्रकरणी शांतिनगर पोलीस ठाण्यात N.D.P.S. कायदा कलम ८(क), २२(ब) तसेच महाराष्ट्र औषध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.