महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन युवती जागीच ठार
आटके टप्पा येथील घटना : घटनास्थळी पोलीस दाखल
Published:5 m 23 hrs 24 min 12 sec ago | Updated:5 m 23 hrs 24 min 12 sec ago
News By : Muktagiri Web Team
कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोन युवती जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-कोल्हापूर लेनवर ट्रक आणि दुचाकी स्कूटीचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील
दोन युवती जागीच ठार झाल्या. डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने युवती ठार
झाल्या.
घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे.