टेंभू ता. कराड येथील टप्पा क्रमांक एक ब धरण परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी आलेल्या सहा युवकांपैकी एक युवती धरणात बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
जुही घोरपडे रा. कराड असे बुडालेल्या युवतीचे नाव आहे.
संबंधित युवतीचा शोध सुरू असून घटनास्थळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह कर्मचारी दाखल झाले आहेत. संबंधित युवती हे आपल्या मित्रांसमवेत रंगपंचमी खेळण्यासाठी टेंभू धरण येथे आली होती. रंगपंचमी खेळत असताना युवतीसह तिच्या दोन सहकाऱ्यांचा पाय घसरून पाण्यात पडली. त्यावेळी बाकी युवकांनी दोघांना वाचवले मात्र युवती पाण्यात वाहत गेली. तिचे शोध कार्य सुरू आहे.