ग्रामस्थांनी केले दै मुक्तागिरी चे कौतुक.. दै मुक्तागिरी ने या घटनेचे सविस्तर वृत्तांकन करुन ग्रामस्थांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल ग्रामस्थांनी प्रतिनिधी व पेपरचे कौतुक केले.
विद्याज्ञान करणार्या गुरुच्या कारणाम्यांनी वैताग लेल्या कराटे ग्रामस्थांनी शाळेलाचं टाळे ठोकले. आडमुठे शैक्षणिक धोरण, बेशिस्त, अविचारी आणि व्यसनाधीन शिक्षकाला कंटाळून मुलांचे भवितव्य लक्षात घेता मच्छिंद्र आढळ या शिक्षकाच्या विरोधात कराटे ग्रामस्थांनी उगारलेल्या लढ्याला अखेर यश आले. कराटे जि. प. शाळेवरुन आढळ शिक्षकाची बदली करण्यात आली असून पं स पाटण शिक्षण विभागाकडे तो पाठवण्यात आला असल्याचे जि प मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांचे लेखी पत्र आज कराटे ग्रामस्थांना मिळाले. दै मुक्तागिरी व त्यांच्या प्रतिनिधी ने सदर शैक्षणिक मुद्दा, मुलांचे शालेय नुकसान लक्षात घेऊन पहिला पासून ग्रामस्थ व शिक्षण विभाग यांच्या धोरणाचे बातमी रुपी कव्हरेज केले होते. दै मुक्तागिरी च्या पाठपुरवठ्याला अखेर यश आले. कराटे ग्रामस्थांनी दैनिकाचे मनस्वी आभार मानले. वैतागलेल्या ग्रामस्थांनी ३१ आँगष्प्ट ला शाळा बंद करुन टाळे ठोकले होते. आज तब्बल १५ दिवसांनी म्हणजे चं १६ सप्टेंबर ला शाळा सुरु करण्यात आली. कराटे शाळा कराड चिपळूण रस्त्यालगत असणारी उपक्रम स्तुत्य व अभिनव अशी शाळा आहे. लोकसहभागातून शाळेची उभारणी झाली आहे. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असून त्रेपन्न विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. गेली अनेक वर्ष मच्छिंद्र आढळ नावाचा शिक्षक या शाळेवरती रुजू झाला होता. सदर शिक्षकाच्या कारनाम्यांनी वैतागलेल्या ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेक खेटे घातले परंतु त्याचे फलित न मिळाल्याने वैतागून लोकांनी शाळेला टाळे ठोकले. तब्बल पंधरा दिवस शाळेचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. अनेक वर्ष पाठपुरवठ्याला न आलेले यश टाळे ठोकताचं जिल्हा आणि महाराष्ट्र खडबडून जागा झाला. जिल्ह्यातील सूत्र हालायला पंधरा दिवस गेले आणि अखेर ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले. सदर शिक्षकाची कराटे शाळेवरुन बदली करावी या मुख्य मागणीला यश आले असून ग्रामस्थांच्या भूमिकेला शासनाने नमते घेतले. वेळोवेळी सा जि बँक उपाध्यक्ष सत्यजितसिंह पाटणकर, पं स सभापती राजाभाऊ शेलार, पं स बबनराव कांबळे, प्र गटविकास अधिकारी दीपा बोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.