प्रशासन किती सतर्क असते, हे या घटनेनं समजले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सर्व युवक घरी पोहोचेपर्यंत अथक प्रयत्न केले. मायेच्या ममतेने बघणारे हे प्रशासन किती सामर्थ्यशाली आहे हे अनुभवता आले. इतरांच्या वेदनेशी समरस असलेले खासदार श्रीनिवास पाटील व मंत्री रावसाहेब दानवे यांचा मला अभिमान आहे. - अक्षय जहागीरदार नावडी, पाटण-सातारा
सातारा जिल्ह्यातून अभ्यास दौºयासाठी गेलेल्या पन्नास तरुणांच्या बसचा मंगळवारी पहाटे हिमाचल प्रदेशातील मंडी येथे बिसापूर घाटात अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच खासदार श्रीनिवास पाटील यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. आपल्या जिल्ह्यापासून हजारो किलोमीटर लांब असतानाही आपल्या लोकांसाठी खासदार पाटील यांंनी दाखवलेली संवेदनशीलता तरुणांना भावली.
सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित केलेल्या बेसिक माउंटन कोर्ससाठी अटल बिहारी वाजपेयी माउंटन इन्स्टिट्युट, मनाली हिमाचल प्रदेश येथे २६ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातील ५० तरुणांची टीम गेली होती. प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करून परत येत असताना मंगळवारी पहाटे ४.४० वाजता मंडीपासून ७२ किलोमिटर दूर असणाºया बिसापुर घाटात बसचा अपघात झाला. सुदैवाने सर्व प्रशिक्षण घेणारे तरुण सुखरूप होते. चालक जखमी झाला होता. सर्व मुलांनी मिळून त्याला बसच्या बाहेर काढले. अपघाताची माहिती तरुणांनी जिल्हा परिषदेच्या डेप्युटी सीईओ अर्चना वाघमळे यांना दिल्यानंतर सीईओ विनय गौडा, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मदतीसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी खासदार पाटील यांनी तरुणांची फोनवरून विचारपूस करून मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी मंत्री दानवे यांनी या तरुणांसाठी रेल्वेच्या एका स्पेशल बोगीची व्यवस्था केली. तसेच खासदार पाटील यांनी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन व सिक्कीम हाऊस दिल्ली येथे राहण्याची व्यवस्था केली. खासदार श्रीनिवास पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तरुणांसाठी संकटकाळात दिलेला माणुसकीचा आधार लाखमोलाचा होता. त्यांच्या या कृतीतून राजकारणापलीकडेच्या माणुसकीचे दर्शन झाले.