स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील भिलार पर्यटन स्थळ म्हणून विकसित करूया : आ.मकरंद आबा पाटील

टायगर केव्ह आणि सनसेट पॉइंट चा लोकार्पण सोहळा संपन्न
Published:Aug 07, 2022 05:01 PM | Updated:Aug 07, 2022 05:01 PM
News By : Satara
स्व. बाळासाहेब भिलारे यांच्या स्वप्नातील भिलार पर्यटन स्थळ म्हणून विकसित करूया : आ.मकरंद आबा पाटील

पाचगणी: तत्कालीन शासनाच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब भिलारे यांनी स्ट्रॉबेरीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावाला पुस्तकांच्या गाव म्हणून  नावारूपाला आणले. कृषी पर्यटनाची संकल्पना ही त्यांचीच आणि त्यांच्याच स्वप्नातील आगळेवेगळे भिलार गाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात असे प्रतिपादन आ. मकरंद आबा पाटील यांनी केले.