कराड : येथील कलावंत विठ्ठल धर्माधिकारी यांची भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघ (शिवणे-धायरी दक्षिण मंडल) सांस्कृतिक सेलच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या नियुक्तीबद्दल केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांनी शुभेच्छा पत्र पाठवून धर्माधिकारी यांना अभिनंदन केले. विठ्ठल धर्माधिकारी हे मूळचे कराड येथील असून सध्या ते नांदेड सिटी पुणे येथील रहिवासी आहेत. या निवडीबद्दल त्यांचे खडकवासला मतदारसंघ दक्षिण मंडलचे अध्यक्ष रुपेश घुले पाटील, सरचिटणीस हेमेंद्र जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
“एका कलाकाराला याहून मोठा सन्मान काय असू शकतो,” अशा भावना धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या.