ढेबेवाडी : माथाडी कामगारांचे भाग्यविधाते मराठा आरक्षण मागणीचे जनक (कै) आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.२५) नवीमुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी.दिली.
गुरुवारी सकाळी 9.30 वाजता नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट लिलावगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, जलसंपदा मंत्री.राधाकृष्ण विखे - पाटील,वनमंत्री.गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल,पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर,खासदार नरेश म्हस्के, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड,आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक
आदींसह आधीकारी, पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.मेळाव्यात गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, सरचिटणीस नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.