पाटण दि. ३० : कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात हेळवाक गावच्या नैऋत्येला सहा किलोमीटर अंतरावर कोयना धरणापासून चार किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. या भूकंपाची खोली पाच किलोमीटर अंतरावर होती. कोयनेसह परिसरातील गावात हा भूकंप जाणवला आहे. या भूकंपाचा कोयना धरणावर कोणताही परिणाम झाला नसून कोठेही कसलीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.