‘खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून, आतापर्यंत खा. उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे,’ अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली.
लिंब : ‘खा. उदयनराजे भोसले यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत समाजकारण केले आहे. लिंब गावातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी त्यांनी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने रस्त्याचे काम मार्गी लागले असून, आतापर्यंत खा. उदयनराजे भोसले यांनी गावातील विकासकामांसाठी 70 लाख रुपयांचा निधी दिला आहे,’ अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी दिली.
लिंब गावातील रस्त्यासाठी खा. उदयनराजे भोसले यांच्या खासदार फंडातून 15 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचा शुभारंभ सरपंच अॅड. अनिल सोनमळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
बाळासाहेब गोसावी म्हणाले, ‘मोठे गाव असल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यकर्ते गावात असतात. हीच खरी लोकशाही आहे. मात्र, जेव्हा गावाच्या विकासाची गोष्ट येते तेव्हा राजकीय, वैचारिक मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येणे यातूनच विकास घडत असतो. खा. उदयनराजे भोसले यांनी देखील राजकारणापलीकडे जावून गावासाठी आतापर्यंत 70 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला आहे.’
सध्या कोरोना संसर्गामुळे सर्व समाज एका संकटातून वाटचाल करत आहे. या संकटात देखील लिंब ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच अॅड. अनिल सोनमळे यांनी सर्वांना बरोबर घेऊन एकदिलाने जे काम केले आहे, ते उल्लेखनीय असल्याचे सांगून गोसावी यांनी अॅड. सोनमळे यांचे अभिनंदन केले.
सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन गोसावी यांनी केले. तसेच खा. उदयनराजे भोसले यांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
यावेळी उमेश पाटील, राहुल पाटील, संदीप सोनमळे, अशोक करंजे, दीपक शिंदे, अमित पाटील, राजेश शेटे, जीवन सोनमळे, दत्ता वणवे, संतोष सावंत, विशाल राजे, दिलीप सावंत, सुरेश जाधव, लहू सावंत, सुनील जमदाडे, सुरेश सावंत, तुळशीराम सावंत, योगेश सोनमळे, दिलीप वंजारी, लक्ष्मण मापारी, रवींद्र काबंळे, कीर्तीकुमार तारू, हणमंत करंजे, नाना निकम, दत्ता गिरी, बाबू खादगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.