नागठाणे - शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानवर्धन, ज्ञान संवर्धन आणि ज्ञानदान याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली या संस्थेच्या नागठाणे महाविद्यालयाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत असून या निमित्ताने प्रमुख पाहुणे मा. प्रा. डॉ. डी. टी. शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व मा. अभयकुमार साळुंखे कार्याध्यक्ष तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेदरम्यान माहिती दिली.
. डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षण संस्था स्थापन tकरून शिक्षणाचे पवित्र कार्य केले ज्ञानापासून शतकांनो शेतके वंचित दुर्लक्षित राहिलेल्या दीनदलित आदिवासी यासारख्या सामाजिक स्तराच्या आत्मोउन्नतीसाठी स्वतःला वाहून घेऊन त्यांच्या युगानुयुगे अज्ञानरूपी अंधाकाराने भरलेल्या झोपड्या ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून टाकल्या.याच ध्येयने 28 जून 2000 मध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनेते यांच्या प्रयत्नातून नागठाणे महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. नागठाणे व नागठाणे परिसरातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची उच्च शिक्षणाची सोय झाली. हे महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सन 2024 - 25 या रौप्य महोत्सवी औचित्य साधून या महाविद्यालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
रौप्य महोत्सवाच्या वर्षातील उपक्रम
महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व कोरी पाटी प्रोडक्शन तारळे यांच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय अभिनय व संगीत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा, इंग्रजी संभाषण कौशल्य विषयावर आधारित कार्यशाळा, नशाबंदी विषयावर पोस्टरचे प्रदर्शन, वाडमय मंडळ उद्घाटन, बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये एन एस विद्यार्थिनी राख्या बांधण्याचा उपक्रम, एन एस एस व एन सी सी विभागाच्या वतीने एक पेड मा के नाम या
अभियानाअंतर्गत जांभळेवाडी गावात 250 वृक्षांची लागवड, इतिहास विभाग व इतिहास संशोधन मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑगस्ट क्रांती दिन साजरा, महाविद्यालयात अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन, शिवाजी विद्यापीठ सातारा जिल्हास्तरीय युवक महोत्सवात सहभाग ( एकांकिका - प्रथम क्रमांक - लोकवाद्य एकलवादन, द्वितीय क्रमांक - समूहगीत उत्तेजनार्थ व समूह गायन उत्तेजनार्थ पारितोषिक मध्यवर्तीला लोकवाद्य एकलवादनात तृतीय क्रमांक व लघुपट उत्तेजनार्थ प्रथम), कॉमर्स विभागाच्या वतीने आत्मनिर्भर करिअर या विषयावर व्याख्यान, वाचन कट्टा उपक्रम सुरू करण्यात आला, स्वच्छता ही सेवा या विषयावर पोस्टर, एन एस एस व एन सी सी यांच्या वतीने सज्जनगड स्वच्छता व प्लास्टिक मुक्त अभियान मोहीम, स्वच्छता ही सेवा अभियान परिसर स्वच्छता, जिमखाना विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ सातारा टेबल टेनिस स्पर्धा आयोजन, इंग्रजी विभागाच्या वतीने A Study Of Language and Literature: Opportunities and Challenges in the Era, वाचन प्रेरणा दिन
महाविद्यालयाचे नियोजित उपक्रम
व्याख्यानमालेचे आयोजन करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार व चर्चासत्राचे आयोजन करणे, स्मरणिका तयार करणे, माजी विद्यार्थी यशोगाथा स्मरणिका, महाविद्यालय परिसरात सुशोभीकरण करणे, विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू करणे, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या वस्तूंचे प्रदर्शन, साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, माझी गुरुदेव कार्यकर्ता सत्कार समारंभ, माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा, शौर्य/माजी सैनिक स्मृती उद्यान, महारोजगार मेळावा, बहुउद्देशीय सभागृह बांधकाम इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.