हिंद केसरी संतोष वेताळसह अन्य एकास अटक
News By : Muktagiri Web Team
वडूज, दि. 8 ः राजाचे कुर्ले ता. खटाव ग्रामपंचायतशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न साधता संबंधित ग्रामपंचायत चा ना हरकत दाखला आणि ग्रामसभा ठराव बोगस पणे सादर करून त्याच गावातील एका जमीन गटाचा बिगर शेती परवाना करणाऱ्या दोघांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी हिंदकेसरी पैलवान संतोष पांड़रंग वेताळ (रा. सुल ता. कराड जि. सातारा) तर आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत राजाचे कूर्ले ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांच्या तक्रारी वरून वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडूज पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ग्रामपंचायत राजाचे कुर्ले येथे जुलै 2022 मध्ये गावातील गट नं. 1471 मधील बिगर शेती परवाना व त्याला जोडलेली सर्व कागदपत्रे याबाबत तहसिलदार, खटाव यांचेकडे माहीतीच्या अधिकाराखाली अर्ज करून सरपंच यांनी मागितली होती. त्यानंतर गट नं, 1471 ची बिगर शेतीची कागदपत्रे सुमारे 15 ते 20 दिवसानंतर प्राप्त झाली. सदर कागदपत्राची खात्री केली असता आनंदा शंकर मोरे रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि, सांगली व पैलवान संतोष पांड़रंग वेताळ रा. सुरली ता. कराड जि. सातारा यांनी केलैल्या अर्जात दिलेल्या कागदपत्रापैकी ग्रामपंचायत राजाचे कु्ले यांचे दि. 09/10/2020 रोजीचे जावक क्र. 127/2020 व 128/2020 या क्रमांकाचे नाहरकत दाखला याच पाहणी केली असता सदरचे दाखले हे बनावट व खोटे असल्याचे लक्षात आले, तसेच सरपंच राजे भौसले यानी आणखी खात्री केली असता सदर दाखल्या वर दिनांक 26/01/2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या ग्रामसभेत गट नं. 1471 मधल आनंदा शंकर मोरे यानी दिलेल्या कागदपत्रात ग्रामसभेने सर्वानुमते दिलेला ना हरकत दाखला हा बनावट दाखला आहे. सदर दिवशी आनंदा शंकर मोरे यांचे मालकिचा गट क्र. 1471 हा भुखंड नक्हता, तसेच आनंदा शंकर मोरे यांनी ग्रामपंचायत राजाचे कुर्ले मध्ये ना हरकतीसाठी कसलाही मागणी अर्ज केलेला नव्हता, त्यामूळे सदरचा नाहरकत दाखला व त्यामधील संपुर्ण मजकुर तसेच त्यावरील सही व शिक्के बनावट व खोटे असल्याचे दिसून आले. तर संतोष पांडुरंग वेताळ यांचे नावचे ना हरकत दाखल्यात सदरचा दाखला कोणत्या दिवशी दिला तसेच त्यावरील सुचक व अनुमोदक यांची नावे नसल्याचे समोर आले. . सदर दाखल्यावरील सर्व मजकुर सही व शिक्के खोटे व बनावट असून सदर दोन्ही दाखल्यांचा आरोपींनी स्वतःचे वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेला आहे. तरी दि. 09/10/2020 रोजी वड़ज ता. खटाव गावचे हद्दीत तहसील कार्यालय वडूज येथे यातील आरोपी आनंदा शंकर मोरे व संतोष पांड्रंग वेताळ यांनी केलेल्या अ्जात दिलेल्या कागदपत्राप्पकी ग्रामपंचायत राजाचे कुर्ले यांचे दि. 09/10/ 2020 रोजीचे जावक क्र.127/2020 व 128/2020 या क्रमांकाचे ना हरकत दाखला तसेच सदर दाखल्यावरील सर्व मजकुर सही व शिक्के खोटे व बनावट असुन दोन्ही दाखत्यांचा आरोपनी स्वतः:चे वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केलेला असल्याची तक्रार सरपंच राजे भोसले यांनी वडूज पोलिसांत दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आनंदा मोरे व पैलवान संतोष वेताळ या दोधांना ताब्यात घेतलं आहे. आज वदुज पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.