पाटण/प्रतिनिधी
जगभरात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाटण तालुक्यातील मोरणा भागातील दुर्गम डोंगराळ मौजे पाचगणी याठिकाणी मनसेचे उपोषण कायम राहिले आहे. पवनचक्की कंपनी ने शेतकर्यांवरती केलेल्या अन्यायकारक गोष्टींचा पडदा फाश करुन वेळोवेळी प्रशासनास जाग आणण्याचा मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी आंदोलने, उपोषण करुन प्रयत्न केला. बुधवार दि १४ आँगष्ट २०२४ रोजी हे उपोषण सुरुचं राहिले आहे.
मनसेचे पाटण तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी सोमवार दि. १२ आँगष्ट रोजी पवनचक्की कंपनीविरोधात डोंगर पठारावरती आमरण उपोषण सुरु केले आहे. सलग तिसर्या दिवशी उपोषण कर्ते यांनी आपला निर्धार कायम ठेवला असून ठोस निर्णय दिल्याशिवाय लढा मागे नाही असं प्रशासनाला कळवले आहे. मंगळवारी दिवसभर प्रशासकीय यंत्रणेतील कोणीही उपोषण स्थळी फिरकले नाही. मंगळवारी रात्री उशिरा पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोपें व तहसीलदार अनंत गुरव यांनी उपोषण स्थळी भेट दिली होती.
तद्नंतर बुधवारी उपोषण स्थळी कोणीही फिरकले नाही. उपोषण कर्ते यांची प्रकृती खालवली गेल्याने मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाँ. ननावरे व आरोग्य सेवक सोपान पाटील यांनी वेळोवेळी उपोषणस्थळी भेट दिली.
एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना दुसरीकडे याच देशाचा पोशिंदा असलेले शेतकरी बांधव यांच्या कंपनी कडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढत असताना त्यांना जाणूनबुजून प्रशासन डावलत आहे हे दुदैवी आहे असं मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले.