रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित विजेच्या तारेचा शॉक लागल्याने ग्रामपंचायत शिपायाचा मृत्यू
कराड तालुक्यातील आबईचीवाडी येथील घटना
Published:Jul 20, 2024 11:24 AM | Updated:Jul 20, 2024 11:24 AM
News By : Muktagiri Web Team
कराड : कराड (जि सातारा) तालुक्यातील आबईचीवाडी येथील ग्रामपंचायत शिपाई यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. राजेंद्र शंकर जाधव (वय 48) असे संबधित मृत्यू झालेल्या चे नाव आहे . गावातील ग्रामपंचायत पाणी योजनेचे पाणी सुरू करून जात असताना त्यांना रस्त्यावर पडलेल्या प्रवाहित वीज तारेचा शॉक लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान त्यांच्यासोबत असणारे त्यांचे चुलत भाऊ उत्तम दिनकर जाधव हे सुदैवाने त्या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांना राजेंद्र जाधव यांना शॉक लागल्याचे लक्षात येतात त्यांनी त्याची माहिती गावातील उपसरपंच अशोक माने व कुटुंबीयांना दिली त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे पोलीस ही घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.