स्वातंत्र्य दिनी डोंगरमाथ्यावर शेतकर्यांचे उपोषण
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण/प्रतिनिधी
सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मोरणा भागात शेतकर्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला महाउर्जा पुणे व पवनचक्की कंपनीला सोयसुतक नाही हे दुदैवी. पनामा पवनचक्की कंपनी विरोधात मनसेचे आमरण उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरुचं राहिले.
पाटण तालुक्यात मोरणा भागात मौजे पाचगणी याठिकाणी शेतकरी व मनसेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांचे सोमवार दि. १२ पासून उपोषण सुरु आहे. स्वातंत्र्यदिन सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना याच देशाच्या नागरिकांना आपल्या न्याय हक्कासाठी झगडावे लागले आणि न्याय मिळवण्यासाठी लढावे लागते हे दुदैवी आहे.
डोंगरपठारावरती दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती शीं सामना करत राहत असलेला गोरगरीब शेतकरी वर्गाला आपल्या जीवाच्या, मुलांच्या भवितव्याचा विचार करुन बलाढ्य कंपनी शी लढताना आज किमाण स्वातंत्र्य दिनी ही स्वातंत्र्य नाही असं म्हणावे लागेल.
देशात भारतीय म्हणून राहत असताना जगाचा पोशिंदा शेतकरी वर्ग प्रचंड दबावाखाली वावरत आहे. पाच वर्ष पनामा पवनचक्की कंपनीच्या बेकायदेशीर कारभाराविरोधात महाउर्जा विभाग पुणे यांच्याशी कागदपत्री लढा देत आहे. आज १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना आपापल्या कार्यालयात ध्वजारोहण करुन जिलेबी गोड धोड खाण श्रेष्ठत्व समजाणे अधिकारी वर्ग व कंपनी चे अधिकारी यांना शेतकर्यांची तिळमात्र काळजी नाही. आज दिवसभर प्रशासकीय कोणीही डोंगरमाथ्यावर फिरकले नाही च परंतु त्यांची साधी दखल घेणे ही महत्त्वाचे वाटले नाही.
आम्हाला या देशात न्याय मिळत नसेल तर आम्ही भारतीय म्हणून राहणे गैर आहे. आमचं भारतीयत्व काढून घ्यावं आणि आम्हाला मरायला मोकळं करा अश्या तीव्र भावना समस्त उपोषणकर्ते व शेतकरी वर्गाने मांडले.