‘त्या’ कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न... कराड बसस्थानकात सापडलेल्या चोरट्यांच्या टोळीशी आर्थिक तडजोड करणाऱ्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याची चर्चा कराड शहरात दबक्या आवाजात सुरू आहे. ह्या प्रकरणाला आठ दिवसापूव वाचा फुटून सुद्धा अजून कोणतीच ठोस कारवाई का झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कराडकर शंका उपस्थित करत असल्याची खुमासदार चर्चा कराड शहरात आहे.
कराड ः येथील बसस्थानकात सापडलेल्या चोरट्यांच्या टोळीशी आथक तडजोड करुन चोरट्यांना सोडून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गत आठ दिवसांपुव या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई झालेली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून केवळ कागदी घोडी नाचवली जात आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना क्लिन चिट दिली जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कराड बसस्थानकात आठ दिवसांपुव पाकिटमारी करणाऱ्या तीन चोरट्यांना चौकीतील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याव्ोळी आथक तडजोड करुन संबंधित चोरट्यांना बाहेरच्या बाहेर सोडून देण्यात आले. या तडजोडीचा आकडा एवढा मोठा होता की त्यामध्ये अनेकांनी ‘वाटे’ घेतले. त्यामुळे ‘तेरी भी चुप, मेरी भी चुप’ म्हणत सर्वांनीच या प्रकरावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर या प्रकाराला वाच्यता फुटली आणि मलिदा घेणारे पोलिसांचे पितळ उघडे पडले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना याबाबतची चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी उपअधिक्षकांना अहवाल दिला असून संबंधित कर्मचाऱ्यांची बसस्थानक पोलीस चौकीतून उचलबांगडी करीत त्यांना दुसऱ्या चौकीत नेमणूक देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात ‘वाटा’ घेणाऱ्या खासगी व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. मात्र, याचदरम्यान लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्याने त्या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले. संबंधित कर्मचारीही सर्व काही अलबेल असल्याच्या अविर्भावात वावरत आहेत. अधिकारी कागदी घोडी नाचवून थंडावले असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना क्लिन चिट देण्याचा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.