सातारा पोलिस दलाने महिला सुरक्षितता यासाठी 'अभया' उपक्रम सुरु केला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन व परिसरात हा उपक्रम राबवला जाणार आहे. पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत आज पाटण शहरात अँटोरिक्षांवरती क्यु आर कोड व माहिती स्टिकर लावण्यात आले.
खाजगी, प्रवासी वाहनातून शहरात किंवा इतरत्र प्रवास करत असताना महिलांना काही तक्रार, अडचण असेल तर त्यांनी तो क्यु आर कोड त्वरित स्कँन करायचा आहे. या कोड मुळे तात्काळ जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये लोकेशन सहित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सातारा पोलीस दलाचे हे काम खरोखर कौतुकास्पद आहे.
पाटण नवीन बसस्थानक परिसरात अँटोरिक्षांवरती हे स्टिकर चिटकवण्यात आले. यावेळी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक कवटेकर, सातारा येथील चव्हाण, पुजारी, ट्राफिक चे मोहिते, नलावडे, रिक्षा चालक मालक व पाटण शहरातील नागरिक उपस्थित होते.