जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने प्रशासनाने नियम आवळायला सुरुवात केली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायियकावर कारवाई करण्यात आली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने प्रशासनाने नियम आवळायला सुरुवात केली आहे. तरीही जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत सातारा शहर पोलिसांनी सहा व्यवसायिकांवर तर बोरगाव पोलिसांनी एका व्यवसायियकावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी, अमरलक्षी, सातारा येथे जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून मोमीन चिकन सेंटर अँड एग्ज ही आस्थापना दि. 21 रोजी सायंकाळी 5.20 पर्यंत सुरू असल्याचे आढळून आले. याप्रकरणी महंमद दस्तगिर शेख वय 18 रा. धनगरवाडी, ता. सातारा याच्यावर साथरोग प्रतिबंधक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे करत आहेत.
देगाव फाटा येथे सुभाष गंगाराम जांभळे वय 66 यांनी त्यांचे रॉयल जेन्टस् पार्लर सुरू ठेवल्याचे शहर पोलिसांना आढळून आले. त्यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे करत आहेत. देगाव फाटा येथीलच भंडारी हाईटस् येथील दिनेश उत्तम रणसिंग वय 45 याने माऊली किराणा स्टोअर्स रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवल्याचे दिसून आले. प्रशासनाने वेळ ठरवून दिलेली असूनही नियम मोडल्याबद्दल त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अहिरे कॉलनी, सातारा येथील किरणा दुकान रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी लक्ष्मण आकाराम जाधव वय 55 रा. करंडी, ता. सातारा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राधिका रोडवरील गम्मत जमत वाईन शॉपमधून घरपोच दारू पोच न करता दुकानाचे शटर अर्ध उघडे ठेवून जाग्यावरच दारू विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पो. ना. राहूल खाडे यांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी प्रदीप श्रीरंग मोरे रा. आंबेदरे, ता. जि. सातारा याच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन एमआयडीसी येथील झेंडा चौकात गुरुकृपा टायर वर्क्स सुरू ठेवल्याचे आढळून आले. जिल्हाधिकार्यांचा आदेश मोडल्याप्रकरणी प्रितम संतोष बर्गे रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय अतित, ता. सातारा येथील श्री दत्त एजन्सी हे किराणा दुकान 11 वाजून गेले तरी उघडे असल्याचे दिसून आले. याप्रकरणी संदीप राक्षे यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.