घरोघरी शाळा या उपक्रमामुळे शिक्षण गंगा घरोघरी पोहोचली : शबनम मुजावर
Published:Sep 15, 2021 09:09 AM | Updated:Sep 15, 2021 09:21 AM
News By : Muktagiri Web Team
शाळा बंद पण शिक्षण चालू या साठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे.सभापती प्रणव ताटे उपसभापती रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी शाळा हा उपक्रम राबवला जात आहे.अध्यन साहित्य विध्यार्थ्यांना घरी पुरवून पालकांच्या सहाय्याने शिक्षण सुलभ होण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न होत आहेत.
ओगलेवाडी: कोरोनामुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत.ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा येत आहेत.यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कराड पंचायत समिती आणि शिक्षण विभाग यांच्या वतीने घरोघरी शाळा हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या मुले शिक्षण शेवटच्या घटका पर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे प्रतिपादन कराड तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी शबनम मुजावर यांनी केले. कोळेवाडी (ता.कराड) येथे घरोघरी शाळा वर्गाचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच रत्नमाला पाटील, विस्तार अधिकारी जमिला मुलानी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पाटील व केंद्रप्रमुख सुवर्णा मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गटशिक्षण अधिकारी म्हणाल्या, कोणते बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या साठी शिक्षण विभाग प्रयत्न शील आहे.शिक्षक आणि पालक यांच्या समन्वयातून मुलांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी या उपक्रमाची मदत होणार आहे.या वेळी त्यांनी मुलांशी व पालकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला.पालकांनीही या उपक्रमाचा चांगला फायदा होत असल्याचे नमूद केले.हे वर्ग सुरु करण्यासाठी उपसभापती रमेश देशमुख याचे विशेष सहकार्य लाभले.वर्ग रचना,जागा आणि साहित्य लावून आकर्षक रचना करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.नियोजित कार्यक्रमामुळे त्यांना या प्रसंगी उपस्थित राहता आले नाही तरी या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी सुरेखा माने,ज्योती चिखले,वसंतराव जाधव. रमेश शेवाळे संतोष पाटील,उज्वला पातले,उपस्थित होत्या.वर्ग तयार करण्यासाठी मुख्याध्यापक मोहन शिनगारे,शोभाताई चव्हाण,संदीप कोरडे,विध्यारणी पाटील,रुक्सानाबी मुल्ला,प्रमोद गायकवाड,शुभांगी गुजर व राजलक्ष्मी देशमुख यांनी परिश्रम घेतले