क्रीडा संकुलातील कोविड हॉस्पिटलमुळे रुग्णांना दिलासा मिळणार

ना. बाळासाहेब पाटील : कोविड हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न
Published:Apr 26, 2021 01:16 PM | Updated:Apr 26, 2021 01:16 PM
News By : Muktagiri Web Team
क्रीडा संकुलातील कोविड हॉस्पिटलमुळे रुग्णांना दिलासा मिळणार

‘राज्यासह जिल्ह्यात दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सातारा जिल्हा कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात 78 ऑक्सिजन बेड असून कोरोना रुग्णांवर उपचार होणार आहे. रुग्णांना यामुळे निश्‍चितच एक दिलासा मिळणार आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.