वाघ वाचला तरच मानवीसाखळी सुरक्षित : मंगेश ताटे-पाटील
News By : Muktagiri Web Team
कराड : वाघ हा जीवसृष्टीतील टॕपचा प्रिडिएटर असल्यमुळे वाघ वाचला पाहिजे तर वाघ वाचवण्यासाठी जंगलांसह वन्यजीवाचे रक्षण केले पाहिजे. जंगलातील वाघ वाचला तरच मानवी साखळी सुरक्षित राहील असे मत पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे- पाटील यांनी व्यक्त केले. समाजात वन्य प्राण्याबाबत माहिती व्हावी यासाठी इंद्रधनू विचारमंच फाउंडेशन व सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज ,कराड यांचे संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत पेंच व्याघ्र प्रकल्प,नागपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे- पाटील यांनी विद्यार्थ्यांना सचित्र मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजचे प्राचार्य डाॅ. मोहन राजमाने होते. यावेळी इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, माणिक डोंगरे ,संदीप चेणगे, अशोक मोहने व प्रमोद तोडकर, प्राणीशास्त्र विभागप्रमुख ए. यु. सुतार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख विजय रानभरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वनाधिकारी मंगेश ताटे-पाटील म्हणाले गवताच्या काडी पासून ते सर्व जीवसृष्टी ही एखमेकाला पूरक आहे. या जीवसृष्टीच्या अन्नसाखळीतील टॉपचा प्रिडिएटर हा वाघ असतो, तर वाघाला जंगल वाचवते. जंगल आणि वाघ हे संपूर्ण जीवसृष्टीचा समतोल राखण्याचे काम करत असतात. भरमसाठ वृक्षतोड होत असल्यामुळे मानवाचे जंगल संपदेवर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. ही धोक्याची घंटा आहे. हा समतोल राखायचा असेल तर पर्यावरण संवर्धन करणे ही देशातील प्रत्येक नागरिकांची नैमित्तिक जबाबदारी आहे. प्राचार्य डॉ. मोहनराव राजमाने म्हणाले, लोकसंख्या आणि यांत्रिकिकरणामूळे मानवाचे जगलवर अतिक्रमण झाले आहे. वेगवेगळ्या कारणाने ज्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्याप्रमाणात वृक्षारोपण होत नाही. परिणामी निसर्गाचा समतोल बिघला आहे. तो समतोल राखण्याची जबाबदारी या नवीन पिढीवर आहे. त्यासाठी मंगेश ताटे-पाटील यांच्यासारख्या पर्यावरणवादी तळमळ असणारे अधिकारी निर्माण झाले पाहिजेत. तर अशा अधिकाऱ्याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. ए. यु. सुतार यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद तोडकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तर विजय रानभरे यांनी आभार मानले.