सहकार मंत्री तथा पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील ,खासदार श्रीनिवास पाटील ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये ,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक एम.रामानुजम , मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, नाना खामकर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच अत्याधुनिक वन्य प्राणी व पक्षी यांच्या उप्चारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर वराडे ता.कराड येथे सुरु होणार आहे. महाराष्ट्रातील दुसरे शासकीय ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर आहे. - महादेव मोहिते ,उपवनसंरक्षक
कराड : नागपूर नंतर महाराष्ट्रातील दुसरे शासकीय वन्यजीव उपचार केंद्र (ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर) मंजूर झाले आहे. त्यासाठी ७ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी नुकताच उपवनसंरक्षक सातारा यांचे कार्यालयाकडे वर्ग झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वन्यजीवांकरीता अत्याधुनिक उपचार पद्धतीने सुसज्य असे वन्यजीव उपचार केंद्र मंजूर झाले असून याचा फायदा सातारा जिल्हयाबरोबरच कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग ,रत्नागिरी तसेच सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील जखमी वन्यजीवांना तातडीचे उपचार देणेकरीता होणार आहे. सद्यस्थितीमध्ये जखमी वन्य प्राण्यांवर उपचार करणे करिता पशुवैद्यकीय दवाखान्यातील ऊपलब्ध सुविधांचा वापर करावा लागतो. परंतु मूलतः वन्यप्राण्यांवर उपचार करणेकरता वेगळ्या सुविधांची आवश्यकता असते. वन्य प्राण्यांवर उपचार करताना कमीत कमी मानवी संपर्क व तातडीने उपचार करून लवकरात लवकर त्यांना मूळ अधिवासामध्ये सोडणे आवश्यक असते. या दृष्टीने आवश्यक उपचारपद्धती जसे की रेडिओथेरपी, पोर्टेबल एक्स-रे यांसारख्या अद्ययावत सुविधांनी हे उपचार केंद्र सुसज्ज असणार आहे. सदर उपचार केंद्रामध्ये मांसभक्षी प्राणी – पक्षी, तृणभक्षी प्राणी – पक्षी, तसेच जलचर प्राण्यांसाठी वेगवेगळे पिंज-यांची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या नैसर्गिक अधिवासाशी मिळते जुळते असे वातावरण तयार करण्यात येणार आहे. सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील तसेच खासदार श्रीनिवास पाटील ह्यांनी सातारा जिल्हयामध्ये वन्यजीवांच्या उपचाराकरीता अत्याधुनिक असे उपचार केंद्र व्हावे अशी संकल्पना मांडुन त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनविभागास दिले होते. दरम्यान मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत गेल्या वर्षी महाराष्ट्रात ठिक- ठिकाणी वन्यजीवांच्या उपचारासाठी ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्यासाठी घोषणा केली. त्याअनुषंगाने सातारा जिल्हाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे ह्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून जागेच्या निवडी पासून ते नकाशा तयारकरणे पर्यंत प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. खासगी वास्तू विशारद महेंद्र चव्हाण यांनी याकामी नकाशे तयार करणेकरीता मोलाचे सहकार्य केले. जंगलात वावरणाऱ्या वन्यजीवांना पाळीव जनावरांच्या दवाखानाय्त उपचार केल्यास पाळीव जनावराच्या रोगांची लागण त्यांना होऊ शकते त्यामुळे वन्यजीवांन्साठी वेगळे उपचार करायची गरज भासते.
वन्यजीवांवर उपचार करताना वेगवेगळा पद्धतीचे पिंजरे असावे लागतात तसेच उपचार करताना वन्यजीव मध्ये निर्माण होणारा तणाव कमी करण्यासाठी विशिष्ठ पद्धतीचा अवलंब करावा लागतो तो ह्या केंद्रात होणार आहे. खासदार श्रीनिवास पाटील ह्यांनी वराडे येथे भेट देऊन उपयुक्त व मोलाच्या सूचना केल्या. सदर उपचारकेंद्र मंजुर होणेकरीता प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, तत्कालीन मुख्य वनसरंक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, सध्याचे मुख्य वनसंरक्षक श्री. आर. एम. रामानुजनम,उपवनसंरक्षक, महादेव मोहिते यांनी सकारात्मक प्रयत्न केले. या उपचार केंद्र करीता राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत निधी वितरीत करणेत आला.