भाजपच्या वतीने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांसाठी टास्क फोर्सची निर्मिती
News By : Muktagiri Web Team
सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे.
सातारा : सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोनाग्रस्त सहायता समिती, टास्क फोर्स बनवण्यात आला आहे. या टीमकडे बेड उपलब्धता आणि हॉस्पिटल माहिती, इंजेक्शनबाबत माहिती, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून ज्यादा बिल आकारणी बाबत तक्रार निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटरबाबत माहिती हे विभाग वाटून दिले आहेत आणि त्यांचे काम सुरू झाले आहे.
कोरोनाग्रस्तांना कशाप्रकारे मदत करता येईल हे ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंदभाऊ देशपांडे, भाजप उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, सातारा जिल्हा प्रभारी सदाशिवभाऊ खाडे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीमध्ये भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘माझा बूथ कोरोना मुक्त बूथ’, ‘माझा बूथ लसीकरण युक्त बूथ’ या तत्वानुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी काम करावे असे ठरले.
बैठकीला प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदनदादा भोसले, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर बेड किंवा हॉस्पिटलची माहिती वेळेवर मिळावी. त्याचप्रमाणे रेमडीसीविर इंजेक्शन मिळावे आणि लोकांचे प्राण वाचावेत, यासाठी भाजपने जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासाठी 15 कार्यकर्त्यांची टीम तयार केली आहे. प्रत्येक शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येकी दहा असे एकूण 175 जणांची टीम तयार केली आहे. या टीमकडे बेड उपलब्धता आणि हॉस्पिटल माहिती, इंजेक्शनबाबत माहिती, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती, रुग्णालयाकडून ज्यादा बिल आकारणी बाबतचे तक्रार निवारण, लसीकरणाबाबत माहिती आणि कोरोना कोविड सेंटरबाबत माहिती हे विभाग वाटून दिले आहेत आणि त्यांचे काम चालू झाले आहे.
जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी केलेल्या सुचने नुसार सातारा जिल्हा संघटन सरचिटणीस चंद्रशेखर वढणे यांनी प्रमुख पदाधिकार्यांचे फोन नंबर आणि नावे हेल्पलाइन म्हणून दिले आहेत. संबंधितांनी सातारा, जावळीसाठी - विठ्ठल प्रल्हाद बलशेटवार (9822215269), विकास विजय गोसावी (9011031794), डॉ. उत्कर्ष सखाराम रेपाळ (8421791983), डॉ. वीरेंद्र घड्याळे (9422400024) यांच्याशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे कोरेगावसाठी - राजेंद्र दगडू इंगळे (9822599139) गणेश पालखे ( 9822425782), अप्पा कदम (9172500555), वाई, महाबळेश्वर, खंडाळासाठी - सचिन घाटगे (9822241548), अलंकार सुतार (8805775164) माण, खटाव, फलटणसाठी सुहास मुळे (8275060182), जयकुमार शिंदे (9595365551) आणि कराड, पाटणसाठी - महेंद्र डुबल (855199153), अजय पावसकर (8275387994) यांच्याशी संपर्क साधावा. औषधांसाठी शैलेंद्र कांबळे 839010112 यांच्याशी संपर्क संपर्क करून अडचणी सांगाव्यात, त्याचे निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, अशी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सांगितले आहे.