'कोयना'त एकाच दिवसात तीन टीएमसी पाणी वाढले
धरणात 20.72 टीएमसी पाणीसाठा
Published:Jul 07, 2022 04:14 AM | Updated:Jul 07, 2022 04:17 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात नवजा, महाबळेश्वर या ठिकाणी 24 तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ होऊन धरणातील पाणीसाठा 20.72 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नवजा येथे सर्वाधिक 244 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चार दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सक्रीय झालेल्या पावसाचा वेग गत चोवीस तासात वाढला आहे. धरणात येणार्या पाण्याची आवक 33,359 क्युसेक झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 103 ममी नवजा येथे 162 मिमी तर महाबळेश्वर येथे 147 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी 2053.1 फूट झाली आहे.