मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सातारा : मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा (मास) व ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2021 रोजी मासभवन येथे कोविड लसीकण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या लसीकरण केंद्राचे उद्घाटन मास अध्यक्ष उदय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले असून, याप्रसंगी मास उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव धैर्यशील भोसले, खजिनदार भरत शेठ, सहसचिव दीपक पाटील, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर सातार्याचे अध्यक्ष उदय देशमुख, संचालक डॉ. प्रताप राजेमहाडिक, मास कार्यकारिणी संचालक संजय सूर्यवंशी, पृथ्वीराज पोळ, श्रीकांत तोडकर, उपस्थित होते.
शासकीय नियमावलीनुसार याठिकाणी लसीकरणाकरिता लागणारी पुरेशी जागा, पुरेसे मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणार्या विपरित परिणामांची पाहणी करण्याकरिता लागणारी जागा व इतर व्यवस्थापनाकरिता लागणारी गरज लक्षात घेता या लसीकरण केंद्राची निवड करण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेसंबंधी लागणार्या सर्वच बाबींचे सर्वेक्षण करून या जागेची निवड करण्यात करण्यात आली आहे. तसेच टप्प्या-टप्प्याने सदर केंद्रात लसीकरण सुरू राहणार आहे. प्रत्येक लसीसाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार असून, यामध्ये 150 रुपये लसीकरिता व 100 रुपये सेवा शुल्क आकारले जाणार आहे. फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांनंतर 60 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक व 45 वर्षे वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींना याठिकाणी लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच 1 मे पासून 18 वर्षावरिल सर्वांना लस देण्यात येणार आहे.
‘को-विन अॅप’मध्ये नोंदणी झालेले हेल्थ केअर वर्कर, नोंदणी न झालेले फ्रंट लाईन वर्कर यामध्ये पोलीस विभाग, होमगार्ड, नगरपरिषद, तलाठी, तहसील व पंचायत समिती अधिकारी कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले. ऑन्को लाईफ क्लिनिक येथे आतापर्यंत 5000 लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 60 वर्षे वरील सर्व वयोवृद्ध लाभार्थी व 45 ते 59 वर्षे वयोगटातील कोमॉर्बिड व्यक्तींना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून कोविडचे लसीकरण करायचे आहे. यासाठी लस घेणार्या लाभार्थ्यांना ‘को-विन अॅप’च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी कारायची आहे याची नोंद घ्यावी.
अशी आहे नोंदणीची प्रक्रिया..
self registration.cowin.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर आपण आपला खासगी मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक येईल. तो ओटीपी क्रमांक टाकल्यावर आपला मोबाईल क्रमांक नोंदणीसाठी वापरण्यात येईल. त्यानंतर ओळखपत्र क्रमांक, नाव, लिंग, जन्म तारीख व वर्ष ही माहिती भरावी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पासवर्ड तसेच मोबाईल नंबर ने लॉग इन करून उपलब्ध लसीकरणाची दिनांक निवडून व लसीकरण केंद्राच्या नावांमधील ऑन्को लाईफ क्लिनिकचे नाव तुम्ही निवडू शकता. कोरोना लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे-मोबाईल नंबर, आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र वय तर 45 ते 59 वयोगटातील कोमॉर्बीड व्यक्तींना त्यांचे आरोग्यविषयक प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.