वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे.
म्हसवड : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि बाजीराव ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्या संयुक्त कारवाईत म्हसवड बसस्थानक ते शिंगणापूर चौक दरम्यान असलेल्या खोमणे गुळाचा चहा या व्यावसायिकाने आपल्या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त लोक एकत्र करून सोशल डिस्टन्स व मास्क यांचा वापर न करता संसर्ग वाढवण्यास कारणीभूत होऊन जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सील करण्यात आले.
तसेच शहरातील मुख्य पेठेतून फिरून जिल्हाधिकारी यांनी दि. 27 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. जो व्यापारी, नागरिक या जमावबंदीचे उल्लंघन करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तरी म्हसवड शहरातील व परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
तर गेल्या 2 दिवसांत 29 विना मास्क नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 14500 व सोशल डिस्टन्सचा 7000 असा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईत मुख्याधिकारी सचिन माने, सहायक पोलीस निरीक्षक, बाजीराव ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सरतापे, संतोष बगल, भादुले, रेवणनाथ खंदारे, शिवाजार भोसले व इतर कर्मचारी वर्गाने केली.