कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला युवक बेपत्ता
जलाशय गाळमिश्रीत असल्याने गाळात रुतून बसला असण्याची शक्यता
Published:6 m 1 d 20 hrs 30 min 58 sec ago | Updated:6 m 1 d 20 hrs 30 min 58 sec ago
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने पोहायला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मित्रांसोबत कोयना धरणामध्ये पोहायला गेलेला गाडोखोप गावातील अर्जुन शरद कदम वय २२ या युवक धरणातील गाळमिश्रीत पाण्यात बेपत्ता झालेला आहे. मुलांबरोबर उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी सहज पोहणे युवकाच्या जीवावर बेतले आहे. युवक जलाशयामध्ये बेपत्ता झाल्याने गाडोखोप गावावरती शोककळा पसरली आहे. कोयना धरण सध्या गाळमिश्रीत आहे. बेपत्ता झालेल्या युवकाला शोधण्याचे काम उशीरा पर्यंत सुरु होते. कोयना धरणाच्या उजव्या तीरावर असणाऱ्या गाडोखोप या गावातील तीन ते चार युवक कोयना धरणाच्या पात्रात बाजे या ठिकाणी पोहायला गेला होता. युवक पोहत असताना त्यातील अर्जुन कदम हा युवक खोल गाळात अडकून गायब झाला आहे. सदर युवकास शोधण्यासाठी प्रयत्न झाले परंतु अद्यापही तो मिळून आलेला नाही. हा युवक गाळात रुतून बसला असण्याची शक्यता आहे. यास शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे त. या घटनेची नोंद कोयना पोलीस स्टेशन ला झाली असून सपोनि नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.