कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार विमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी विमा योजना तत्काळ सुरू करावी, याबाबत तहसीलदार आर. सी. पाटील यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले. व ठरल्याप्रमाणे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस केले.
फलटण : कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना इत्थंभूत माहिती मिळावी, यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार विमा संरक्षणापासून वंचित राहत आहेत. यासाठी आज मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी विमा योजना तत्काळ सुरू करावी, याबाबत तहसीलदार आर. सी. पाटील यांना फलटण शहर व तालुक्यातील पत्रकारांनी निवेदन दिले. व ठरल्याप्रमाणे आरोग्य मंत्र्यांना एसएमएस केले.
संपूर्ण देशात कोरोनाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. तथा महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तरीही सर्वसामान्य लोकांना व वाचकांना जगात, देशात व राज्यातील कोरोना संदर्भात माहिती मिळावी, यासाठी राज्यातील हजारो वार्ताहर, पत्रकार, बातमीदार आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता आपले काम करीत आहेत. मात्र, त्यांना आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी सांगितले होते की 500 पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. 50च्या जवळपास पत्रकारांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि कोरोनानं 25 पत्रकारांचे बळी गेले आहेत.
आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी बुलढाणा येथील एका कार्यक्रमात बोलताना पत्रकार हे ‘कोरोना योद्धेे’ असून, कोरोनामुळे पत्रकाराचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोनानं 25 पत्रकारांचे बळी गेल्यानंतर देखील एकाही पत्रकाराच्या नातेवाइकांना सरकारकडून मदत मिळाली नाही. यामुळे राज्यातील ठाकरे सरकारला आठवण करून देण्यासाठी आज हे निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार कल्याण निधीचे प्रमुख रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, अॅड. रोहित अहिवळे, यशवंत खलाटे-पाटील, सचिन मोरे, श्रीकृष्ण सातव, युवराज पवार, विक्रम चोरमले, शक्ती भोसले, अनिल पिसाळ, अनमोल जगताप, प्रवीण काकडे, आनंद पवार, अभिषेक सरगर उपस्थित होते.