‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक्ती पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून संस्थेची परंपरा कायम राखली आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षात संस्थेत ढोबळ नफा 2 कोटी 4 लाख झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 18 लाख झाला आहे,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी दिली.
सातारा : ‘कोरोनामुळे अर्थव्यवस्था अडचणीत असताना सहकार क्षेत्रातील अग्रेसर असणारी शिवशक्ती सहकारी पतसंस्था लि., शिवथरने सन 2020-2021 या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. विविध अडचणीवर मात करत शिवशक्ती पतसंस्थेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून संस्थेची परंपरा कायम राखली आहे. सन 2020-2021 या आर्थिक वर्षात संस्थेत ढोबळ नफा 2 कोटी 4 लाख झाला असून निव्वळ नफा 1 कोटी 18 लाख झाला आहे,’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी दिली.
प्रभाकर साबळे म्हणाले, ‘दि. 31 मार्च 2021 अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय 156 कोटी झालेला आहे. गत वर्षाच्या तुलनेत त्यात 13 कोटीने वाढ झाली आहे. 31 मार्च 2021 अखेर 89 कोटीच्या ठेवी, 67 कोटी 30 लाख कर्जवाटप, 5 कोटी 82 लाखांचे भागभांडवल, 4 कोटी 29 लाखाचा निधी आहे. संस्थेने विविध बँकांमध्ये 28 कोटी 61 लाखांची गुंतवणूक केली आहे. संस्थेची सभासद संख्या 10,290 झाली आहे. संस्थेचे खेळते भांडवल 103 कोटी 80 लाख आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवरील शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक यांनी संस्थेवर दाखलेल्या विश्वासामुळेच संस्थेस हे उत्तुंग यश प्राप्त करणे शक्य झाले आहे.’
संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्यांनी कोरोनाच्या संकटकाळात संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीने काम केल्याने संस्थेच्या नफ्यात वाढ झाली आहे. संस्थेच्या एकूण 12 शाखा सीबीएस संगणक प्रणालीमध्ये कार्यान्वित असून ग्राहकांसाठी एसएमएस सुविधा, एनईएफटी, आरटीजीएस, लॉकर सुविधा तसेच ऑनलाईन वीजबिल भरणा यासारख्या अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. संस्थेने सेवकांना 12 टक्के बोनस जाहीर केलेला आहे. संस्था स्थापनेपासून सातत्याने मिळणारा ऑडिट ‘अ’ वर्ग, प्रति वर्षी लाभांश तसेच ग्राहकांशी असणारे सौजन्याचे नाते व तत्पर सेवा अशा अनेक बाबींमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास दृढ होत आहे.
याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन रमेश साबळे, संचालक हणमंत साबळे, मधुकर नलवडे, विजय साबळे, सतीश कदम, भानुदास कदम, वीरेंद्र कदम, किशोर शिंदे, राहुल गायन, गोरख माने, शांतिलाल माने, उमा धुमाळ, शुभांगी कदम, तज्ज्ञ संचालक किसन गोडसे, बाळा फाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कदम व सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित उपव्यवस्थापक राजेंद्र नांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.