सातार्‍यातील भाजी मंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद

पोलिस प्रशासन आणि सातारा पालिकेचा निर्णय 
Published:Apr 23, 2021 01:44 PM | Updated:Apr 23, 2021 01:44 PM
News By : Muktagiri Web Team
सातार्‍यातील भाजी मंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा शहरातील सर्व भाजीमंडई आणि रस्ते शनिवारपासून बंद करण्यात येणार आहेत. सध्या संचारबंदीची योग्य अंमलबजावणी होत असूनही दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नियम आणखी आवळण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि सातारा नगरपालिकेकडून घेण्यात आला आहे.