शुक्रवार पेठेतील सर्वे नंबर 73 येथील नगरपालिकेच्या जागेच असणाऱ्या एका अतिक्रमीत घराचा वाद सध्या चांगलाच गाजतो आहे. हे घर पाडण्यासाठी पालिकेचा अतिक्रमण विभाग मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गुरुवारी सकाळी तातडीने कोटेश्वर चौकात उपस्थित झाला. मात्र सदर महिला कुलूप लावून बाहेर गेल्याने कारवाई होऊ शकली नाही. येथील घराच्या मूळ मालकाला हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
सातारा : शुक्रवार पेठेतील सर्वे नंबर 73 येथील नगरपालिकेच्या जागेच असणाऱ्या एका अतिक्रमीत घराचा वाद सध्या चांगलाच गाजतो आहे. हे घर पाडण्यासाठी पालिकेचा अतिक्रमण विभाग मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर गुरुवारी सकाळी तातडीने कोटेश्वर चौकात उपस्थित झाला. मात्र सदर महिला कुलूप लावून बाहेर गेल्याने कारवाई होऊ शकली नाही. येथील घराच्या मूळ मालकाला हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
सर्वे नंबर 73 येथील दीपक गुरव हा तरुण गंभीर अपघात झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या कुटुंबियांची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या नाजूक असताना नगरपालिका गुरव कुटुंबीयांचे घर अतिक्रमण या नावाखाली पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी सकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशावरून अतिक्रमण विभाग पुन्हा कोटेश्वर चौकात तातडीने हजर झाला. शहर विकास अतिक्रमण स्थावर जिंदगी सर्व विभागाचे कर्मचारी जातीने उपस्थित झाल्यामुळे शुक्रवार पेठेत अतिक्रमण हटावची मोठी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र दीपक गुरव यांच्या मातोश्री काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते.
नियमाप्रमाणे घरी कुलूप असताना अतिक्रमण काढता येणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नव्हते म्हणून अतिक्रमण विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम यांनी हे अतिक्रमण काढून घेण्यासाठी संबंधित गुरव कुटुंबीयांना तीन दिवसांची मुदत दिली आहे अशा आशयाची नोटीस त्यांनी गुरव यांच्या दरवाजावर चिटकवली आहे. याप्रकरणाचा पंचनामा करून त्याचा अहवाल मुख्याधिकारी अभिजित बापट यांना सादर करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार येथील सर्वे नंबर 74 मध्ये अश्विनी गुरव या महिलेची दीड गुंठा मोकळी जागा आहे. या जागेचा बिल्डरच्या माध्यमातून विकास करायचा त्यांचा मनसुबा आहे. त्यामुळे नगरपालिकेची सर्वे नंबर 73 येथील लगतची जागा राजकीय वरदहस्ताने ताब्यात घेतली जाणार असल्याचा आरोप खाजगीमध्ये होत आहे. यासाठी राजकीय दबावतंत्र वापरून संबंधित गुरव कुटुंबियांना विनाकारण त्रास देत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे.