‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
लिंब : ‘कोविड लसीकरणासाठी रजिट्रेशन करणे महत्त्वाचे आहे, अजूनपर्यंत तरी लसीकरणासाठी रजिट्रेशन करण्याची टक्केवारी कमी आहे. लस संपली म्हणून कर्मचार्यांनी न थांबता लसीकरणासाठी शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेच पाहिजे, असे म्हणत ‘हागणदारी मुक्त गाव’ या अभियानासारखे ‘कोरोनामुक्त गाव’ असे फलक गावाबाहेर लागावेत,’ अशी आशा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी व्यक्त केली.
लिंब येथे कोरोनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत, सरपंच अॅड. अनिल सोनमळे, उपसरपंच दादा बरकडे, वैद्यकीय अधिकारी अरुण पाटोळे, मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, तलाठी शंभू सपकाळ, सयाजी सावंत, प्रवीण राऊत, घनशाम सावंत, राजू शेटे, सुबोध भोसले, दत्तात्रय सावंत, दिलीप सोनमळे, राहुल सावंत, सुरेश पाटील, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
मुल्ला म्हणाले, ‘सातारा तालुक्यात खोजेवाडी, कुशी, वर्णे गाव हॉट स्पॉट झाली आहेत. कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, सातारा तालुक्यात लिंब गाव मोठे असून या गावाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. गावातील सर्व्हे करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांची नेमणूक करावी. कुशी गाव हायरिस्कमध्ये असून, या गावात एकाच दिवशी 33 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. कुशी गावात आरोग्याच्या बाबतीत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच कोरोना महामारीच्या काळात लिंब गावातील लोकांचा असलेला सहभाग हा मोठा आहे. याप्रमाणेच इतर गावातीलही लोकांनी अशाच पद्धतीने लोकसहभाग घ्यावा.’
गेले सहा महिने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोणावरही बंधने नव्हती, परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या तिपटीने वाढत आहे त्यामुळे सर्वांनी स्वत:सह कुटुंबाचे संरक्षण करावे.’
दरम्यान, जितेंद्र सावंत आणि अॅड. अनिल सोनमळे यांनी लॉकडाऊनबाबतच्या अडचणी सांगितल्या. यावर प्रांताधिकार्यांनी ग्राम प्रशासनास सर्व अधिकार दिले असून, तुम्ही त्यांची अंमलबजावणी करा. जर कोणी नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ. अरुण पाटोळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुरू असलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान, कोरोना हद्दपारीसाठी युवकांचा सहभाग पाहून मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी यांनी स्वतः पाच हजार रुपयांची मदत प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्या हस्ते या ग्रुपला केली.
कोरोना महामारीच्या काळात लिंब गावातील युवकांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन यात्रा साजरी न करता कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रास जी मदत केली, त्या युवकांचे काम प्रेरणादायीअसून इतर गावांनी या युवकांचा आदर्श घेऊन कार्य करावे, असे आवाहन यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.