कुरणेवाडीच्या खांडेकर बंधूंचे अडीच एकरात कांद्याचे 12 लाखांचे उत्पन्न

शेतीतील नियोजनबद्ध व्यवस्थापनाचे फलीत : पिचलेल्या शेतकर्‍यांसमोर ठेवला नवा आदर्श
Published:Feb 25, 2021 12:28 PM | Updated:Feb 25, 2021 12:28 PM
News By : Muktagiri Web Team
कुरणेवाडीच्या खांडेकर बंधूंचे अडीच एकरात कांद्याचे 12 लाखांचे उत्पन्न

कांदा हे कधी शेतकर्‍यांच्या तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील आणि दुष्काळ शापित माण तालुक्यातील शेवटचे टोक असणार्‍या कुरणेवाडीतील कांतीलाल खांडेकर व संजय खांडेकर या दोन भावांना कांद्याचे पीक वरदान ठरले आहे. त्यांनी अडीच एकर कांद्याच्या शेतीतून तब्बल 12 लाखांचे उत्पन्न मिळवून पिचलेल्या शेतकर्‍यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.