कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या लाकूड व्यवहारात 30 लाखांचा अपहार 

जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार : चौकशी करण्याची मागणी
Published:Apr 26, 2021 10:40 AM | Updated:Apr 26, 2021 10:43 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाग्रस्त मृतांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या लाकूड व्यवहारात 30 लाखांचा अपहार 

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारावरील प्रत्यक्ष खर्च आणि सातारा पालिकेने काढलेल्या बिलात तफावत आहे. प्रत्येक मृत व्यक्तीमागे दोन हजार जादा खर्च होत असून आजअखेर दीड हजारांहून जास्त मृतांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. म्हणजेच जवळपास 30 लाखांचा अपहार झाला असल्याचा आरोप अमित शिंदे, बाळासाहेब शिंदे व जितेंद्र वाडकर आदींनी केला आहे.