जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित न केल्यास 29 ऑगस्टपासून उपोषण करणार

सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा इशारा
Published:Aug 05, 2022 03:13 PM | Updated:Aug 05, 2022 03:13 PM
News By : Satara
जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबित न केल्यास 29 ऑगस्टपासून उपोषण करणार

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मनमानी, भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराबाबत नेहमीच तक्रारी होत असतात.  परंतु, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करावे, अन्यथा 29 ऑगस्टपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाव्दारे दिला आहे.