नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे

 बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीती :  सापळा लावण्याची मागणी
Published:Aug 02, 2022 02:21 PM | Updated:Aug 02, 2022 02:24 PM
News By : Satara
नागठाणे भरतगाववाडीत आढळले बिबट्याचे ठसे

काही दिवसांपूर्वीच सातारा तालुक्यातील भरतगाव येथे महामार्गालगतच बिबट्याने दर्शन देण्याची घटना घडली असतानाच सोमवारी पुन्हा भरतगाववाडी (ता.सातारा) येथे एका शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सातारा वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पहाणी केली आहे.