पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळणार्या चोरट्यास अटक, एटीएम फोडणार्या चोरट्यांवर कारवाई
Published:Jul 18, 2022 10:09 AM | Updated:Jul 18, 2022 10:09 AM
News By : Muktagiri Web Team
कराड ः एटीएम मशिन फोडणार्या चोरट्यांना रंगहाथ पकडले असून चोरट्यांनी पोलिसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत चार चोरट्यांपैकी तिघे जण फरार झाले असून एका चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे. येथील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. कराड शहर पोलिसांच्या या थरारक कामगिरीचे कौतुक होत आहे. याबाबत घटनास्थळावरून येथील गजानन हौसिंग सोसायटीमध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम काही लोक फोडत असल्याची माहिती मिळताच दामिनी मोबाईल व बीट मार्शल पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. यावेळी चौघे जण एटीएम फोडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांना पकडत असतानाच चोरट्यांनी पोलसांच्या तोंडावर स्प्रे मारून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका चोरट्यास पोलिसांनी पकडले ठेवले तर तिघे जण फरार झाले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...