गोवारेत डोक्यात दगड घालून युवकाचा खून
Published:Jun 26, 2021 07:27 AM | Updated:Jun 26, 2021 07:27 AM
News By : Muktagiri Web Team
कराड, ः गोवारे-चौंडेश्वरीनगर येथे डोक्यात दगड घालून युवकाचा निर्घृण खून झाला आहे. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे. किरण लादे (वय 27) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. खून मागचे कारण व हल्लोखोरांचा तपास पोलीस करत आहेत. खून झालेल्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
Nice