नेचल हेळवाकमध्ये ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणावर डबरचे उत्खनन
सखोल चौकशी करण्याची ‘मनसे’ची मागणी
Published:Mar 08, 2021 03:09 PM | Updated:Mar 08, 2021 03:09 PM
News By : Muktagiri Web Team
पाटण तालुक्यातील नेचल (हेळवाक) येथे बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे डबर मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग करून मिळवले जात आहे. याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत पाटण तालुका अध्यक्ष गोरख मारुती नारकर यांनी पाटणचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेचल (हेळवाक) येथील बंधारा यांचे काम चालू असून संबधीत ठिकाणी बेकायदेशीर ब्लास्टींग करून डबराचे मोठया प्रमाणावर उत्खनन करण्यात आले आहे. हा परिसर कोयना विभाग-सह्याद्री व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोनमध्ये येत आहे. या भागामध्ये ल. पा. विभागाकडून बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. परंतु, संबधित प्रशासन हे काम हे खाजगी ठेकेदारामार्फत करून घेत आहे. याठिकाणी कोणत्याही नियमांचे पालन न करता याठिकाणी जंगलामध्ये ब्लास्टींग करून मोठया प्रमाणावर डबराचे उत्खनन करण्यात आले आहे. अजूनही काम मोठया प्रमाणावर सुरू असून यापुढेही सुरू राहणार आहे. या कामास महसूल विभागाकडून बंधार्यासाठी आवश्यक असणारे डबर काढणेसाठी ब्लाटींग करण्यास मान्यता आहे काय? संबधीत ठेकेदाराने याबाबत प्रशासकीय मंजूरी बाबतचे कागदपत्रे देवून वरील परवानगी घेतली आहे काय? याबाबत आपल्या कार्यालयास याची माहिती देणेत आली आहे काय? प्रशासकीय मंजूरी आहे का? तसेच कोयना विभाग - सहयाद्री व्याघ्र प्रकल्पच्या बफर झोन मध्ये येत असून याठिकाणी ब्लास्टींग करून मोठया प्रमाणावर डबर उत्खनन केले आहे. याबाबत महसूल विभागाकडील तहसिल पाटपरवानगी संबधीत विभागास देणेत आली आहे? अगर कसे याबाबतची माहिती सखोल चौकशी करून सदरचा अहवाल मिळणेत यावा, असे निवेदनात म्हटले आहे.