सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे.
वडूज : सातेवाडी (ता. खटाव) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आण्णा शंकर कोळेकर यांच्या उसाच्या शेतीस शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे 1 लाखाची वित्तहानी झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वडूज-पुसेगाव रस्त्यानजीक सातेवाडी कॉर्नर जवळ गट नं. 83 मध्ये कोळेकर यांच्या वडिलार्जित मालकीच्या शेतात सुमारे 2 एकर ऊस आहे. गुरुवारी दुपारी अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत शेतातील बहुतांशी ऊस तसेच ड्रीप साहित्य, पाइपा जळून खाक झाल्या आहेत. याबाबत वीज वीतरण कंपनी, कृषी विभाग तसेच महसूल विभागास कल्पना दिली आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत पंचनाम्याची कार्यवाही झाली नव्हती.
प्रशासकीय अधिकार्यांनी दुर्घटनेचा तातडीने पंचनामा करून बाधीत शेतकर्यास नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी सरपंच हणमंतराव कोळेकर यांनी केली आहे.