सातारा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले. तसेच गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरासमोरही काही अज्ञातांनी शेणी जाळण्याचा प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या असंतोषातून या घटना घडल्याचे समजले जात आहे.
सातारा : सातारा येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक करून कार्यालयाचे नुकसान केले. तसेच गृहराज्य मंत्री शंभुराज देसाई यांच्या घरासमोरही काही अज्ञातांनी शेणी जाळण्याचा प्रकार घडला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्याच्या असंतोषातून या घटना घडल्याचे समजले जात आहे. दरम्यान, पोलीस पोहोचायच्या आतच आ. शशिकांत शिंदे यांनी दगडफेक करणार्या युवकांच्या घरी जावून संबंधितांच्या घरच्यांना समज देत ‘मुलांना आवरा’ असे सुनावले.
याबाबत माहिती अशी, नुकताच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्याचे जाहीर केला आहे. त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. सातारा येथील राष्ट्रवादी कार्यालयावर काही अज्ञातांनी दगडफेक केली व कार्यालयाच्या काचा फोडल्या. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच आ. शशिकांत शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा निषेध करत दगडफेक करणारे मराठा असूच शकत नाहीत, कारण मराठा समोरुन वार करतो, असे सांगत या षडयंत्रामागे कोण आहे, याचा पोलिसांनी 24 तासांत तपास करावा, असे आवाहन केले. तसेच केंद्राने मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी केली.
यानंतर राष्ट्रवादी भवनावर दगडफेक करणार्या युवकांच्या घरी पोलिस पोहोचण्यापूर्वीच आ. शिंदे, तेजस शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले. आ. शिंदे यांनी युवकांच्या कुटुंबियांना समज देत मुलांना आवरण्याचे आवाहन केले. यावेळी काही राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान, ना. शंभूराज देसाई यांच्या घरासमोर शेणी जाळणार्या युवकांचाही सुरू आहे.