वेण्णा नदीलगत लिंगमळा येथे अनधिकृत बांधकामाचा धडाका

प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट : पर्यावरणप्रेमींकडून संताप
Published:Apr 04, 2021 08:55 PM | Updated:Apr 04, 2021 08:55 PM
News By : Muktagiri Web Team
वेण्णा नदीलगत लिंगमळा येथे अनधिकृत बांधकामाचा धडाका

महाबळेश्‍वरमधील वेण्णालेक नदीपात्रातील परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोन धनिकांविरुद्ध नगरपालिकेने गुन्हा दाखल केला गेला असून देखील याच परिसरातील लिंगमळा येथील सर्व्हे नंबर 35 मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम नदी पात्राला लागून करण्यात आले असून, नगरपालिकेकडून  कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा न्याय, असा अन्याय का? असा सवाल देखील कारवाई झालेल्या बांधकाम धारक