तब्बल 35 वर्षानंतर ‘या’ गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; ग्रामस्थांचे आंदोलन मागे
दैनिक मुक्तागिरीच्या महत्वपूर्ण भूमिकेने प्रशासनाने घेतली दखल
Published:Jan 27, 2021 07:33 AM | Updated:Jan 27, 2021 08:57 AM
News By : पाटण I विद्या म्हासुर्णेकर-नारकर
मळ्याचे दोन ठिकाणी गाव वसणार आहे तो ठराव पूर्ण झालेला आहे. कोळणेचा ठराव अंतिम टप्प्यात आहे तर गावला पसंत असणार्या व शिल्लक असणार्या जमिनी आम्ही देतो जमिनी देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत आम्ही देतो व प्रस्ताव पूर्ण करून देतो. मळे गावाचा सर्वे लवकरचं पूर्ण करतो तो प्रस्ताव नागपूरला जाऊन लवकरचं पूर्ण करुन मार्च अखेर पूर्ण करतो. संकलनाच्या त्रुटी महसूल पूर्ण करतो. मुल्यांकनातील त्रुटी दूर करतो. मुल्यांकनातील त्रुटींचा समितीच्या बैठकिमध्ये अंतिम निर्णय होईल. - महादेवराव मोहिते, वनविभाग अध
मळे-कोळणे-पाथरपुंज गावच्या रखडलेल्या पुनर्वसनाबाबत गेल्या अनेकवर्षापासूनचा बधितांचा आवाज शासनाच्या कानी पाडण्यासाठी दैनिक मुक्तागिरीने महत्वाची भूमिका बजावल्याने महसूल व वनविभागाचा लवाजमा दप्तरासह आंदोलनस्थळी दाखल झाला. बाधित जनतेची आणि शासन अधिकार्यांची समोरासमोर चर्चा होऊन प्रश्नांची सोडवणूक झाली अन् अखेर मागण्या मान्य झाल्याने बाधित जनतेने आपले आंदोलन मागे घेतले.
मळे, कोळणे, पाथरपुंज गावच्या पुनर्वसनाबाबतीतील अडीअडचणी दूर झाल्याने अखेर पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे, दरम्यान आंदोलनस्थळी प्रत्यक्ष प्रश्नांची सोडवणूक झाल्याने बाधित जनतेनेही दैनिक मुक्तागिरीचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे.
मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुर्नवसानाचा प्रश्न गेली 35 वर्ष शासन दरबारी रखडत पडलेला होता. पुर्नवसन संघर्ष कृती समिती यांच्या माध्यमातून या तिन्ही गावांच्या व तेथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी सोमवारी पडली. आंदोलन सुरू असताना सोमवारी सायंकाळी उशिरा पाटणचे उपविभागिय तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, वन्यजीवचे अमित मोहिते, सावंत साहेब, तलाठी, कर्मचारी आदी महसूलसह वनविभागाचे अधिकारी आपले दप्तर घेऊन लवाजम्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कृती समितीचे संजय कांबळे, संजय पवार,दिपक कांबळे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत अधिकार्यांपुढे पोटतिडकीने आपली गार्हाणी मांडली. अधिकार्यांनीही समर्थकपणे उत्तरे दिली. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराडचे उपसंचालक उत्तमराव सावंत, चांदोली राष्ट्रीय उद्यान विभागाचे वनाधिकारी महादेवराव मोहिते, सहाय्यक वनरक्षक सातारा किरण कांबळे, हेळवाकचे वनक्षेत्रपाल अमित भोसले, तलाठी भरत जाधव, महसूल, वन्यजीव, वनविभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Mast