बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोक धास्तावले

गजबजणार्‍या बाजारपेठा झाल्या नि:शब्द : छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर
Published:Apr 19, 2021 12:57 PM | Updated:Apr 19, 2021 12:57 PM
News By : Muktagiri Web Team
बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोक धास्तावले

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. बाधितांचा आकडा वाढू लागल्याने ग्रामीण भागांतील लोकांची झोप उडाली आहे. वाढत्या संख्येने मन धास्तावले आहेत. गजबजणार्‍या बाजारपेठा सुद्धा नि:शब्द होऊ लागल्या आहेत. बाधितांचा जिल्ह्याचा रोजचा आकडा हजाराच्या घरात जाऊ लागला आहे. गावे सुद्धा हॉटस्पॉट बनू लागली आहेत. एकीकडे गावागावांत ही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे रोजी रोटीचे साधन बंद झाल्याने छोटे-मोठे व्यावसायिक परिस्थितीने निरुत्तर झाले आहेत.