सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे 

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची माहिती : 31 मार्च 2023 पर्यंत अंतिम मुदत
Published:2 y 4 m 9 hrs 46 min 3 sec ago | Updated:2 y 4 m 9 hrs 46 min 3 sec ago
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्ह्यात आधार कार्ड व निवडणूक ओळख पत्र जोडणे सक्तीचे 

सातारा जिल्ह्यात 25 लाख 73 हजार 30 मतदार असून या मतदारांचा निवडणूक ओळखपत्र व आधार कार्डाचा लिंकिंग कार्यक्रम एक ऑगस्ट पासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यासाठी मतदारांनी छापील नमुना अर्ज नंबर 6 भरून तो मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले. या कार्यक्रमासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2023 देण्यात आली आहे.