सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
वडूज : सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सरपंच रोमन, उपसरपंच बोटे यांच्या निवडीसाठी सदस्य संतोष काळे, नवनाथ नामदास, उषा बोटे, सुरेखा बोटे यांनी विशेष सहकार्य केले.
वृषाली या युवा व्यावसायिक विक्रमशेठ रोमन यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीनंतर पॅनेलचे प्रमुख कार्यकर्ते व हितचिंतकांनी गुलालाची उधळण करण्याबरोबर फटाक्यांची आतषबाजी केली.
निवडीनंतर बोलताना रोमन म्हणाल्या, ‘पॅनेलच्या सर्व सदस्य व नेतेमंडळींनी आपल्यावर मोठ्या विश्वासाने सरपंच पदाची जबाबदारी टाकली आहे. सर्वांच्या विश्वासास पात्र राहून ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहे. मागील कालावधीप्रमाणेच यापुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार आहेत. सातेवाडी गावचा चेहरा, मोहरा बदलण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहू.’
उपसरपंच बोटे यांनीही सर्वांना धन्यवाद दिले.