भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.
फलटण : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजअखेर कोणताही न्याय सवलत व इतर सुविधा न मिळणारा समाज म्हणजे महाराष्ट्रातील घडशी समाज असून, सध्या कोरोनामुळे आमच्या समाजातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पवार यांनी केली आहे.
पूर्वीपासून देवस्थानांमध्ये सनई-चौघडा, नगारा वाजवणे, लग्न समारंभामध्ये सनईवादन, बँड-बँजो, मावळा ग्रुप यासारखी कामे करणे, फुलांचे हार बनविणे या व्यवसायावर आमच्या समाजाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, सध्या सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून आमच्या समाजातील अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे राज्य सरकार व सर्वच समाजातील दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत करून दिलासा द्यावा, असे पवार यांनी सांगितले. समाज हा पूर्वीपासूनच गरिबीत जीवन जगणारा समाज हा भूमीहिन आहे. त्यामुळे वरील
व्यवसायावरच कसे बसे जीवन जगतो व या व्यवसायावर अवलंबून असतो. समाजात दररोज रोजीरोटीचा प्रश्न असल्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक सरकारी/खासगी नोकर्यांमध्ये आहेत.
गेल्या वर्षी कोरोनामुळे कोणताही व्यवसाय चालला नाही. सरकारी कोणतीही मदत समाजाला मिळाली नाही.
भूमी नाही, शिक्षणाची ईच्छा असून घरची परिस्थिती बेताची त्यामुळे सरकारी बँकेचे लोन व्यवसायाला मिळत नाही. मग या स्पर्धेच्या युगात टिकून राहून व्यवसाय चालावे यासाठी खासगी कर्ज काढून वरील व्यवसायात गुंतवणूक केली. कोरोनामुळे ते कर्जही फिटले नाही. जवळची जी काही थोडी पुंजी होती तिची मोडतोड करून कसंतरी जीवन जगावं लागलं. व्यवसाय ठप्प असल्याने मुलांच्या शिक्षणाच्या फीसाठी सुद्धा खूपच तारांबळ झाली कसंतरी आत्तापर्यंत कुटुंब जगवलं शहरातील समाज बांधवांचे तर खूपच हाल झाले. त्यामुळे राज्य सरकार व दानशूर व्यक्तींनी घडशी समाजास मदत करावी, असेही पवार यांनी म्हटले आहे.