नांदलापूर ता. कराड गावच्या हद्दीत पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एकावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांकडून संशयताचा शोध सुरू आहे.