मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा
News By : Muktagiri Web Team
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली.
सातारा : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशा मागणीची तब्बल एक हजार पत्रे भाजपा पदाधिकार्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली. पोवई नाका येथील पोस्ट ऑफीसमध्ये भाजपा पदाधिकारी यांनी पोस्टाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रे पोस्टपेटीमध्ये टाकण्यात आली. उर्वरीत पत्र सिनियर पोस्टमास्टर स्वाती दळवी यांच्याकडे देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करत सौ. दळवी यांनी एक स्पेशल बॅग करून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोचवण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
यावेळी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा ऊपाध्यक्ष राहूल शिवनामे, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ.विरेंद्र घड्याळे, महिला मोर्चा जिल्हासरचिटणीस सौ. मनीषा पांडे, सातारा शहर सरचिटणीस जयदीप ठुसे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.रिना भणगे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, सौ. वैशाली टंकसाळे, औद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंगसाळे, युवा मोर्चा सातारा शहर अध्यक्ष विक्रम बोराटे, महिला मोर्चा, शहर सरचिटणीस नेहा खैर, उपाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, कुंजा खंदारे, रवी पवार हे उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शुभेच्छांचा नूसता पाऊस पडतो. पण त्याबरोबरच महाराष्ट्राच्या अभिमानात भर पडेल, असे काही तरी केले पाहिजे. या विचाराने भारावलेल्या मराठीवर प्रेम करणार्या सगळ्यांना एकत्र करून सौ. मनीषा पांडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी एक दोन नाही तब्बल 1000 पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहण्याचा संकल्प पूर्ण केला. मराठी विश्वकोषाच्या अध्यक्ष डॉ. विजयाताई लाड यांनी मराठी दिनाच्या दिवशी आवाहन केले व एक पत्र लिहून पाठवले.
त्याप्रमाणेच सुंदर पत्र सगळ्यांनी लिहले आहे. माय मराठी आमची माय बोली मराठी सहाव्या शतकापासून अस्तित्वात आहे आणि दर्जेदार साहित्याने समृद्ध आहे. ही भाषा अभिजात आहेच फक्त अधिकृतरित्या त्यावर शिक्कामोर्तब आपण करावा, ही प्रेमपूर्वक आग्रहाची विनंतीवजा मागणी भाजपा साताराने केली. कुठलेही कार्य एकत्रीत केल्यास त्याचा परिणाम हा मनासारखा होतो आणि मागणीही अशा व्यक्तीस करावीशी वाटते जो खरोखरच जाणता आहे व ऐकून घेणारा आहे. या कार्यात अनेक बाल मित्रांची साहित्य प्रेमी ग्रुपची, महिला मंडळांची मोलाची मदत झाली. या कार्यक्रमास पोस्टाचे सतीष माने व सचिन फडतरे विनोद मूळीक उपस्थित होते.