खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
निढळ : खटाव तालुक्यातील निढळ येथे जीवन ज्योती ग्राम संघ व जीवन साथी ग्राम संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी निढळमध्ये हा दिन मोठ्या प्रमाणात साजरा होतो, पण यावर्षी कोरोनामुळे हा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी महिलांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा महिलांपर्यंत पोहोचली व आज त्यामुळे महिला मोठंमोठ्या पदावर काम करताना दिसत आहेत. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
महिला ग्राम संघाच्या माध्यमातून निढळ मध्ये महिला सबलीकरणचे खूप मोठे कार्य झाले आहे. निढळमध्ये महिला ग्राम संघाचे कार्यालय आहे व 40 बचत गटांमार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्याचे काम या संघामार्फत केले जाते. महिलांना चांगल्या कामासाठी एकत्र येण्यासाठी बचत गटाने खूप मोठे काम केले आहे, असे ग्रामसंघाच्या अध्यक्ष सुजाता खुस्पे आणि कार्तिकी वाघ यांनी सांगितले.
यावेळी सुजाता बनकर, शबाना शेख, माधुरी दळवी, कोमल खुस्पे, सुषमा काटकर, नीलम शिंदे, प्रिया सावंत, बँक सखी कोमल वसव, प्राची कुलकर्णी व इतर महिला उपस्थित होत्या.
पूजा वसव यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी दळवी यांनी आभार मानले.